🔴 Read the given information first and then solve the Online Test.
खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.
🔴🔴🔴 ProNoun – सर्वनाम :-
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामांचा वापर केला जातो.
A word used instead of noun is called ProNoun.
I, We, You, He, She, It, They etc.
सर्वनामाचे पाच प्रकार पडतात.
🔴🔴 1) Personal ProNoun -पुरुषवाचक सर्वनाम – यामध्ये बोलणारे, वाचणारे आणि ज्यांच्याविषयी बोलतो या तिघांचा समावेश होतो.
🔴 First Person – प्रथम पुरुष – बोलणारा व्यक्ती-
या मध्ये
I, We,
My, Mine, Our, Ours
Me, Us यांचा समावेश होतो.
🔴 Second Person – द्वितीय पुरुष – ज्याच्याशी बोलतो ती व्यक्ती –
या मध्ये
You, You,
Your, Yours,
यांचा समावेश होतो.
🔴 Third Person – तृतीय पुरुष – ज्याच्याविषयी बोलतो ती व्यक्ती –
या मध्ये
He, She, It, They
His, Her, Its, Their
Him, Her, It, Them
यांचा समावेश होतो.
🔴🔴 2) Relative ProNoun – संबंधी सर्वनाम – जे सर्वनाम त्या पूर्वी आलेल्या नामाशी संबंध दाखवत असेल किंवा जेव्हा वाक्यात नामानंतर प्रश्नार्थक सर्वनाम येते व ते सर्वनाम येते व ते सर्वनाम वाक्यातील नामाचा संबंध दर्शवते तसेच दोन वाक्ये जोडण्याचे ही काम करते. त्यास Relative ProNoun असे म्हणतात.
Who – कोण,
What – काय,
Which – कोणता,
That – तो, ती, ते
🔴🔴 3) Interrogative ProNoun – प्रश्नार्थक सर्वनाम – प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
What – काय
Who – कोण
Whose – कोणाचा
When – केव्हा
Where – कोठे
How- कसा
Which – कोणता
🔴🔴 4) Demonstrative ProNoun – दर्शक सर्वनाम –
ज्या सर्वनामाने एखाद्या खास व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होत असेल त्या सर्वनामास दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
This,
These,
That,
Those etc
This is cat.
That is my school.
Those are flowers.
🔴🔴 5) Reflective ProNoun – निजवाचक सर्वनाम –
जेव्हा कोणत्याही क्रियापदाचा कर्ता अथवा कर्म एक वस्तू किंवा एक व्यक्ती असते तेव्हा त्या कर्मासाठी, वस्तूसाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो. त्यास निजवाचक सर्वनाम असे म्हणतात.
Herself,
Yourself,
Themself,
Himself,
Find the pronoun from the sentence. सर्वनाम ओळखा.