Categories
Onilne Test

Articles (उपपदे ) – माहिती & प्रश्नोत्तरे 1 – For Std. 5th to 10th English (#002)

🔴 Read the given information first and then solve the Online Test.
खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.

🔴🔴🔴 Articles – उपपदे  :-
इंग्रजी नामापुढे विशेषणासारखे विशिष्ट शब्द वापरले जातात. त्यांना Articles ( उपपदे )  म्हणतात.
उपपदांचे 2 प्रकार आहेत.
1) Indefinite Article – A / An
2) Definite Article  – The

🔴🔴 1) A / An – Indefinite Article  

🔴 1) एकवचनी सामान्य नामापूर्वी  a या Article  चा वापर करतात.
a woman,  a boy,  a pen,  a car etc.

🔴 2) जेव्हा नामाची सुरुवात a, e, i, o, u  या स्वरांनी होते. त्यावेळी an  हे  Article  वापरतात.
an aeroplane, an orange,  an elephant,

🔴 3) जेव्हा नामाची सुरुवात व्यंजनाने होते. पण त्या व्यंजनाचा उच्चार हा स्वरासारखा होत असेल  तर त्या शब्दापूर्वी an  हे उपपद वापरतात.
an honest man, an hour, etc.

🔴 4) जेव्हा शब्दाची सुरुवात स्वराने होते. पण त्याचा उच्चार हा व्यंजनासारखा होत असेल तर त्या शब्दापूर्वी  an हे उपपद वापरावे.
a European, a union, a university,  etc.

🔴 5) a  किंवा an  हे एकवचनी सामान्य नामापूर्वी वापरातात.
a pencil, a duster, a chalk

🔴 6) धंदा किंवा व्यवसाय  सूचित करणाऱ्या नामापूर्वी  an  किंवा an  चा वापर करतात.
He is an engineer.
She is a dancer.

🔴🔴 अपवाद – a  किंवा an  ही उपपदे खालील बाबतीत वापरत नाहीत.
1) अनेकवचनी नामपूर्वी –  dogs, mobiles,  men, etc.
2) जी वस्तू संख्येत मोजता येत नाही. – wheat, rice,
3) द्रवपदार्थ व घनपदार्थ नावापूर्वी – sugar, water, milk
4) भाववाचक नामापूर्वी – glass, fear, honesty

🔴🔴🔴 The –  Definite Article

🔴 1) अगोदर माहित असलेल्या किंवा ज्याच्या विषयी आपण पूर्वीच बोललेलो आहेत अशा व्यक्ती अथवा वस्तू दर्शवण्यासाठी the  चा वापर करतात.
Rajesh gave me a pencil. The pencil is lost.

🔴 2) जगात एकमेव अस्तित्वात असलेल्या वस्तूंच्या नामापूर्वी the हे  article  वापरतात.
the sun, the moon, the earth , the sky

🔴 3) एकवचनी नाम जेव्हा संपूर्ण जात किंवा वर्ग दाखवते तेव्हा the  हे उपपद वापरतात.
The lion is cruel.

🔴 4) पर्वत, नद्या, समुद्र, बेटे , वर्तमानपत्र, पवित्र धर्मगंथ, वाद्ये, जात व जमात, भौगोलिक नावापूर्वी,  इ. नामापूर्वी the हे उपपद वापरतात.
The Ganga, The Times of India, The Himalayas, The Ramayan , The Kuran, the gitar, the Maratha, The Hindu, The Muslim, the USA, the UK

🔴 5) Superlative Degree मध्ये विशेषणापूर्वी the  चा वापर करतात.
Sagar is the tallest boy in the class.

🔴 6) कालदर्शक शब्द, क्रमवाचक विशेषण, काही शब्दसमूहात  the चा वापर करतात.
The morning, the first, the second,  in the evening,

🔴🔴 अपवाद – the  हे  उपपद खालील बाबतीत वापरत नाहीत.

🔴 शरीराचे अवयव , कपडे, निसर्ग, शहरांची नावे, समूहवाचक नामे, भाववाचक नामे – left hand, my shirt,

🔴 भाषेच्या पूर्वी –  Marathi, Hindi, English

🔴🔴 उपपदांचा वापर कोठे करू नये.
सर्वनामाच्या अगोदर, क्रियापद व सहाय्यक क्रियापद, भाववाचक नाम व विशेषनाम, God  ह्या ईश्वराविषयी उपपदांचा वापर करू नये.

Choose the correct article. योग्य उपपदांची निवड करा. 

706

Articles Online Test 1 - For Standard 5th to 10th English

1 / 10

1. He has  ---- lot of books.

2 / 10

2. ------ Brahmaputra is a great river.

3 / 10

3. She likes to eat ---- apple.

4 / 10

4. ------- earth is round.

5 / 10

5. Sagar got ----- first rank in the class.

6 / 10

6. Monica is ----- European.

7 / 10

7. Kondiba is ---- old man.

8 / 10

8. I am ---- student.

9 / 10

9. Radhika is ------ honest girl.

10 / 10

10. He is learning ---- English.

Your score is

0%

error: Content is protected !!