🟥 🟥 इ. ११ वी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ –
👉 २६ मे पासून ऑनलाइन प्रवेश सुरू होणार; ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार!
राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना झालाय.शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
👉आता महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून २६ मे ही नवी तारीख देण्यात आली असून २६ मे ते ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येईल.
👉 नव्या वेळापत्रकानुसार, दि.26 मे ते 3 जून पर्यंत म्हणजे 9 दिवस 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून दरम्यान आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमांक निवडता येतील.
👉 5 जून रोजी पहिली जनरल मेरीट लिस्ट लागणार आहे.
👉 6 ते 7 जून या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येईल.
👉 8 जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर होईल.
👉 9 जून ते ११ जून शून्य फेरी / कॅप फेरी प्रवेश
👉 11 जून ते 18 जून 2025 – सविस्तर माहिती खालील दिलेली आहे.
👉 विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये.
👉 साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.11वी प्रवेशप्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय.त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र,पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये.यावर शिक्षण संचालनालयकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे.
*******************
11thNewTimeTable2025-26_Page1 11thNewTimeTable2025-26_Page2*********************
🟥 🟥 वारंवार विचारले जाणारे प्रश्न – खालील पानावर क्लिक करून दुसरे पान उघडा.
FAQ FYJC*********************
💥 २६ मे पासून ११ वी ऑनलाइन रजिस्ट्रेशन (Part 1) आणि कॉलेज प्रेफरन्स सुरू होणार आहे!
तुमच्याकडे….
❌ मार्कशीट नाही ?
❌ Leaving Certificate नाही ?
❌ Cast / Non-Creamy Layer नाही ?
तर काळजी करू नका!
“Self Declaration Form” अपलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
🟥 प्रवेशासाठीची वेबसाईट www.mahafyjcadmissions.in