🟩 Read the given information first and then solve the Online Test.
🟩 खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.
Question Tag / Tail Tag :-
संभाषणात विधान करणे व पुष्टीसाठी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. वाक्यांचा Question Tag करण्यासाठी खालील नियमांचा वापर करावा.
🟩 १) सर्वप्रथम दिलेले वाक्य विधानार्थी वाक्य जसे आहे तसे लिहून स्वल्पविराम द्यावा.
🟩 २) त्यानंतर दिलेल्या वाक्यातील सहायक क्रियापद ( Helping Verb ) घ्यावे; परंतु वाक्यात जर सहायक क्रियापद नसेल तर अशावेळी वाक्याच्या काळानुरुप to do ची सहायक क्रियापदे साध्या वर्तमानकाळात do / does तर साध्या भूतकाळात did अशी वापरावीत.
🟩 ३) दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर Question Tag नकारार्थी करावा. व दिलेले वाक्य नकारार्थी असेल तर Question Tag होकारार्थी करावा.
🟩 ४) नकारार्थी Question Tag करताना ‘ not ‘ संक्षिप्त रूप n’t वापरावे.
🟩 ५) शेवटी वाक्यातील कर्त्याला ( Subject ) अनुसरुन सर्वनामी ( Pronoun) कर्ता घ्यावा व प्रश्नचिन्ह वापरावे.
🟩 उदा. 1) I drink tea.
वरील वाक्यात सहायक क्रियापद नाही त्यामुळे काळानुरुप to do ची सहायक क्रियापदे घ्यावी लागतील. drink क्रियापद असल्याने do घ्यावे लागेल. तसेच वाक्य होकारार्थी असल्याने Tag हा नकारार्थी होईल.
I drink tea, don’t I ? असा QuestionTag तयार होईल.
🟩 उदा. 2) Sagar is my friend.
वरील वाक्यात सहायक क्रियापद आहे. वाक्य होकारार्थी असल्याने Tag हा नकारार्थी होईल. Sagar हे नाम असल्याने त्यासाठी सर्वनाम he हे घ्यावे लागेल.
Sagar is my friend, isn’t he ? असा QuestionTag तयार होईल.
🟢 Choose the correct Question Tag for the following sentences. खालील वाक्यासाठी योग्य ते Question Tag निवडा.