🟥 🟥 इ. ११ वी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ –
फेरी क्र. १ साठी वेळापत्रक बाबत महत्वाची माहिती-
➡️ दि. १९ मे सकाळी ११.०० ते २० मे २०२५ सायंकाळी ६.००
विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र ( Practice Session ) – हे सत्र केवळ सरावासाठी असून यामध्ये भरलेली माहिती २० मे २०२५ रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल.
➡️ दि. २१ मे सकाळी ११.०० ते २८ मे २०२५ सायंकाळी ६.००
प्रत्यक्ष नोंदणी करणे व पसंती क्रम नोंदवणे.
१ ते १० पर्यंत कॉलेजची पसंती नोंदवणे.
कोटा ( व्यवस्थापन, इन – हाऊस, अल्पसंख्यांक ) साठी अर्ज
प्रत्येक फेरीपूर्वी Consent आवश्यक
➡️ दि. ३० मे सकाळी ११.००
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
➡️ दि. ३० मे ते १ जून २०२५ सायंकाळी ४.०० पर्यंत
हरकती व दुरुस्ती प्रक्रिया ( Login द्वारे )
➡️ दि. ३ जून २०२५ सायंकाळी ४.००
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
➡️ दि. ५ जून २०२५
गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप ( शून्य फेरी )
➡️ दि. ६ जून २०२५ सकाळी १०.००
वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर जाहीर
➡️ दि. ६ जून ते १२ जून २०२५ सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.००
Proceed for Admission निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.
आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी
पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य
➡️ दि. १४ जून २०२५ रात्री १०.००
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर
*******************
व्यवस्थापन / इन – हाऊस / अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश ६ जून २०२५ पासून सुरु होतील.
प्रवेशासाठीची वेबसाईट www.mahafyjcadmissions.in