Categories
Uncategorized

महाराष्ट्राचे राज्यगीत – संपूर्ण माहिती & मार्गदर्शक सूचना

🔴🔴 महाराष्ट्राचे राज्यगीत – संपूर्ण माहिती :
  “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”  चे औचित्य साधून राज्यातील सर्वांना स्फुर्तीदायक असणारे व महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक राज्यगीत शासनाने स्विकारले आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीताचे यथोचित संस्करण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत १९ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे.

🔴🔴 राज्यगीत गायन / वादन मार्गदर्शक सूचना –

🔴 राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा ही सर्वोच्च राहील.

🔴 शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यगीताचे गायन / वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.

🔴 १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत गायले / वाजविले जाईल.

🔴 राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी , राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यागीत वाजवले / गायले जाईल.  राज्यगीत सुमारे १:४१ मिनिटात वाजवता / गाता येईल.

🔴 राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना, तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजवण्यास / गायनास मुभा राहील.

🔴 राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे रहावे. व राज्यगीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.

🔴 राष्ट्रगीताबाबत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवताना / गाताना त्याचा योग्य तो  सन्मान  करण्यात यावा.

🔴 राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश सन २०२३-२४ या  शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

🔴 राज्यगीत –

RajyaGeet


🔴 १ : ४१ मिनिटांचे
राज्यगीत सुरु करा..


🔴 १ : ४१ मिनिटांचे
राज्यगीत Download करा..

error: Content is protected !!